तडवळा येथिल चार तरुनांची पोलिस विभागामध्ये निवड, सहाय्यक पोलिस अधिक्षक एम रमेश यांच्या हास्ते सत्कार
धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथील चार तरुणाची पोलीस दलात निवड झाली आहे त्याबद्दल
ढोकी पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांचा कसबे तडवळे येथील पोलीस चौकीमध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
तडवळे येथील बालाजी अशोक मुळूक, इरफान मकबुल मुलानी, जावेद तोफिक कोतवाल, यांची मुंबई पोलीस दलात तर अजय मधुकर चव्हाण याची पुणे ग्रामीण पोलीस दलात नियुक्ती झाली याबद्दल
ढोकी पोलीस ठाण्याच्या वतीने या तरुणाचा तडवळे येथील पोलीस चौकी मध्ये ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला यावेळी ढोकी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जगदीश राऊत तडवळा बिटचे जमादार गजेंद्र गुंजकर उपसरपंच प्रताप करंजकर यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
