कुठल्याही जातीपातीचा विचार न करता संत जगावर उपकार करत असतात – ह भ प दत्तात्रय महाराज हुके

परंडा रिपोर्टर

– परंडा शहरातील ब्रह्मांडनायक संत बाळूमामा मंदिर येथे ह भ प दत्तात्रय महाराज हुके यांची कीर्तन सेवा संपन्न झाले.
सकाळी संत बाळूमामा मूर्तीला अभिषेक करण्यात आला त्यानंतर परंडा शहरातील स्वामी समर्थ भजनी मंडळ कुंभेंजा, भोंजा, सोनगिरीभजनी मंडळ व उपस्थित भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला व त्यानंतर कीर्तन सेवा संपन्न झाली यावेळी हुके महाराजांनी कीर्तनामध्ये प्रबोधन करताना सांगितले की श्री संत एकनाथ महाराज म्हणतात संतांचे उपकार शब्दाने वर्णन करता येण्यासारखे नाहीत ते सर्व जीवमात्रांना आपल्यासारखे करतात म्हणजे संतांची जी वृत्ती आहे त्याच वृत्तीचे विचार आचार सर्वांना देतात व हे करत असताना त्यांच्या मनामध्ये कोण कुठल्या जातीचा आहे कुठल्या कुळातला आहे हा विचार नसतो. त्याचं कारण त्यांच्या अंतकरणांमध्ये सर्व प्राणीमात्राविषयी दयाभाव असतो आणि ही दया करत असताना त्यांच्याकडे कोणाविषयीही दुजाभाव नसतो म्हणून संत हेच खरे उदार आहेत म्हणून प्रत्येकाने जीवनामध्ये संत संगती करावी त्यांचे विचार आत्मसात करावेत त्याचप्रमाणे पुढे श्री दत्तात्रय महाराज हुके असेही म्हणाले की अलीकडे संतांना जातीपातीमध्ये विभागले गेले आहे परंतु ते अतिशय खेदजनक आहे. दिनांक 22 जानेवारी या दिवशी होणारा अयोध्येतील भगवान श्रीराम प्रभूंची मूर्ती स्थापन होत आहे त्यानिमित्त सर्वांनी दीपावली सारखा आनंद उत्सव साजरा करावा मूर्ती बसवणं काय आवश्यक आहे याविषयी बोलताना महाराज म्हणाले की ज्याप्रमाणे गाईच्या सर्वांगात दूध व्याप्त आहे परंतु ते एका कास येथूनच काढावे लागते त्याप्रमाणे भगवान चराचरामध्ये व्याप्त आहे तरीसुद्धा उपासने करता मूर्तीची गरज आहे असे महाराजांनी प्रतिपादन केले. यावेळी पुष्कळ जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी संत बाळूमामा मंदिरासाठी बबन पाटील यांनी दहा टाळ भेट दिली. शिंदे ताई यांनी पाच टाळ मंदिरासाठी भेट दिली. यावेळी ह भ प बालाजी महाराज बोराडे, ह भ प नागेश महाराज मांजरे, भाग्यवान महाराज रोडगे,नाना महाराज रोडगे, मृदंगाचार्य मारुती महाराज बारस्कर,काका महाराज गवारे, बापु बोराडे, बळीराम कोळी,अकुशं जमदाडे, राजेंद्र मदने नागेश मदने, गणेश आदलिंगे ,भारतसिंह ठाकुर ,नागनाथ देवकते, जगन्नाथ मदने ,कल्याण मदने, उत्तरेश्वर सुरवशे, प्रेम ठाकूर भारत देवकर,गणेशसिहं सद्दिवाल,अनंतसिंह सद्दिवाल,बाळासाहेब पाडुळे, यांचे सहकार्य लाभले,यावेळी अन्नदानाची सेवा भालचंद्र अवसरे यांची झाली. कार्यक्रमाच्या आयोजन मंदिर समितीच्या केशर वैरागे मदने यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page