पोलिसांनी महिलेकडून दहा हजार रूपये घेवून केला आत्याचार ,पोलीस प्रशासनात खळबळ!

भूम रिपोर्टर दि 4.

पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल व खाजगी जीप चालक यांनी एका महिलेवर आत्याचार करून दहा हजार रुपये फोन पे वर घेतल्याने दोघांवरती भूम पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
भूम पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल दगडू सुदान भुरके व खाजगी जीप चालक तथा होमगार्ड सागर चंद्रकांत माने या दोघांवर भूम ठाण्यात कलम 376,(2) (ए) (एक), 323, 384, 34 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे ही घटना दिनांक 2 फेब्रुवारी रोजी भूम बस स्थानक व आष्टा वाडी शिवार येथे घडल्याचे नमूद करण्यात आले असून गुन्हा 4 फेब्रुवारी रोजी पहाटे दाखल करण्यात आला.

फिर्यादी महिलेने दिलेल्या फिरव्यादीवरून दोन फेब्रुवारी रोजी ती व तिचा दीर दुपारी भूम येथून बार्शीला जाण्यासाठी बसची वाट पाहत असताना पोलीस कॉन्स्टेबल दगडू सुदाम भुरके यांनी तुम्ही कुठन आलात व कशासाठी थांबलात असे म्हणून तुम्ही चोर दिसताय तुम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जातो म्हणून बोलावले त्यांना भूम बाजार तळ ठिकाणी घेऊन गेले मारहाण करून उठबस्या काढण्यास भाग पाडले व सोडून देण्यासाठी दहा हजार रुपयाची मागणी केली. मी मोलमजुरी करणारी ऊसतोड कामगार असल्याने पैसे कोठून देणार असे फिर्यादीने पोलीसाला सांगितले परंतु पोलीस एैकण्यास तयार नाही हे पाहता अखेर फिर्यादीने ज्या ठिकाणी कामाला आहे त्या ठिकाणचे मुकादम यांच्या कडून माने यांच्या खात्यावर फोन पे द्वारे पैसे पाठवण्यास सांगितले पैसे पाठवल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल दगडू सुदाम भुरके यांनी तुम्ही येथे बस स्टँड वर थांबू नका तुम्हाला दुसरे पोलीस पकडतील म्हणून त्या दोघांना मोटरसायकलवर बसवून अष्टावाडी कडे सोडून आले व काही वेळाने पुन्हा दगडू भुरके यांनी फोन वरती कोणालातरी संभाषण करून फिर्यादी महिलेला तुला मॅडमने बोलावले आहे असे सांगून दिराला तेथेच सोडून त्याला गाडीवर घेऊन भूम कडे येत असताना रस्त्याच्या कडेला मोटरसायकल थांबून माझ्यासोबत लगत कर नाही तरच मी तुला मॅडम कडून सोडवणूक करून घेतो असे म्हणत जवळील ज्वारीच्या शेतात फिर्यादीला घेऊन बळजबरीने नेऊन तिचे वर बलात्कार केला व नंतर पुन्हा आष्टा वाडी पाटी येथे सोडून रिक्षा बोलावून रिक्षामध्ये बसून बार्शीला पाठवून दिले. त्या महीलेने घडलेला सर्व प्रकार दिराला व घरच्यांना सांगितला. दुसऱ्या दिवशी भूम पोलिसात फिरत देण्यासाठी आलो असे फिर्यादीमध्ये नमूद असून अशा प्रकारची तक्रार फिर्यादीने दिल्यानंतर भूम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साबळे करीत आहेत

आंदोलनाचा ईशारा

पीडित महिलेला न्याय मिळावा आरोपींना तात्काळ अटक करावे अन्यथा श्रमिक मानवाधिकार संघ महाराष्ट्राच्या वतीने भूम पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाई बजरंग ताटे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page