विनायकराव पाटीलांचे तब्बल ११ दिवसा नंतर अमरण उपोषण मागे:मुख्यमंत्र्यांनी साधला होता संवाद

उमरगा रिपोर्टर दि.21

मराठा समाजाला दहा टक्केआरक्षण मिळाल्याने सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील यांनी तब्बल ११ दिवसा नंतर बुधावरी (दि २१) रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने अमरण उपोषण मागे घेतले आहे.
मराठवाडयातील मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट स्वीकारून सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावे.या मागणीसाठी पाटील यांनी (दि १०) फेब्रुवारी पासून कवठा येथे अमरण उपोषण सुरू केले होते.

विनायकराव पाटील यांनी सलग ११ दिवस अन्नपाणी त्याग करून व कसलेही वैद्यकिय उपचार न घेता सलग अकरा दिवस अमरण उपोषण व आत्मक्लेश,देहत्याग अंदोलन केल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती.त्यांनी उपोषण मागे घ्यावे या करिता माजी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड, माजी मंत्री बसवराज पाटील,कृऊबाचे माजी सभापती जितेंद्र शिंदे,मराठा सेवा संघाचे अध्यक्ष भारत कापसे, समाज विकास संस्थेचे भूमीपुत्र वाघ, संभाजी ब्रिगेडचे आण्णासाहेब पवार,कवठा ग्रामस्थ, विठ्ठल रुक्मीणी भजनी मंडळाचे सर्व सदस्य, काँग्रेस, राष्ट्रवादी,भाजपा,शिवसेना, आदि सामाजिक संघटनांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी त्यांना विनंती केली होती. मात्र पाटील उपोषणाच्या आपल्या भूमिकेवर ठाम होते.जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंब्बासे,उपविभागीय अधिकारी प्रियवंदा म्हाडदळंकर,उपविभागीय पोलीस अधिकारी शेलार,पोलीस निरिक्षक डी.बी.पारेकर व ग्रामस्थांच्या मध्यस्थीने विनायकराव पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

शनिवारी दि १७ फेब्रुवारी रोजी आमदार ज्ञानराज चौगुले यांचे चिरंजीव शुभम चौगुले यांच्या शुभविवाह प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री उमरगा येथे आले असता मुख्यमंत्र्यांनी पाटील यांना फोनवरून मुंबईला या तुमच्या मागण्या संदर्भात चर्चा करू असा संवाद साधला होता. दि.२० फेब्रुवारी रोजी शासनाने मराठा आरक्षणा करिता एकदिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले होते. अधिवेशनात शासनाने मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण जाहीर केले.मराठा समाजाला १० टक्के आरक्षण जाहीर झाल्यामुळे आमरण उपोषण मागे घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page